मुंबई : मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 


जर यापुढे एकही पाकिस्तानी कलावंत बॉलीवुड, नाटक किंवा सीरियल्स मधे काम करताना आढळला तर त्याच्यासोबत निर्मात्यालाही चोप देऊ अशी धमकी खोपकर आणि ठाकरे यांनी दिलीये. 


करण जोहरच्या ए दिल है मुश्किल आणि शाहरुख़ खानच्या रईस चित्रपटाबाबत याआधी घेतलेल्या भूमिकेवरच ठाम असल्याचा पुनरुच्चार आज मनसेकडून करण्यात आला. 


पाकिस्तानी कलावंताचे कार्यक्रम रद्द करणाऱ्या निर्माते आणि कलाकारांचे त्यांनी आभार मानले.