मुंबई : कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीना महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन देणं थांबवावं असा निर्णय, राष्ट्रीय हरित लवादानं घेतलाय. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते शिवाजी वटकर यांनी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्णयामुळे हिंदू जनजागृती समितीच्या न्यायालयीन लढ्याला यश आलं आहे. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीपासून प्रदूषण होत नाही असा प्रचार डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी केला होता. त्यावेळी पर्यावरण विभागानं कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती यांना प्रोत्साहन मिळावं असा आदेश काढला होता. तर डॉ. दाभोलकर कागदी मूर्ती बाबत अपप्रचार करत होते असा आरोप करत हिंदू जनजागृती समितीनं याचिका दाखल केली होती. 


शासनाने अभ्यास न करता दाभोलकर यांच्या प्रभावाखाली येऊन हा निर्णय घेतला होता असं हिंदू जनजागृती समितीचा आरोप आहे.