मुंबई : वर्सोवा बीचवर कोणतंही नो पार्किंग बोर्ड नसताना, तुमची बाईक पोलीस उचलून नेऊ शकतात, आणि येथे नो पार्किंग लिहिलंय कुठे?, असं तुम्ही विचारलं, तर लगेच एक ताप्तुरत्या स्वरूपाचा बोर्ड तेथे लावण्यात येईल. कश्यप कपूर या तरूणाने वाहतूक पोलिसांची ही दांडगाई कॅमेऱ्यात कैद केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरूणासमोर ते त्याची बाईक उचलल्यानंतर नो पार्किंगचा बोर्ड लावत आहेत, वरून त्याला तुला जे काय करायचं असेल ते कर, असं धमकावलं जातंय.


नंतर या मुलाने वाहतूक पोलिसाकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला, पोलीस त्याच्या अंगावर येत होता, पण पोलिसाने मोबाईल पाहून, आधी मोबाईल बंद कर, असं सांगत खाली मान टाकली, यानंतर माझा मोबाईल फेकून देण्यात आल्याचा आरोप कश्यप कपूरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलाय.


कश्यपचा हा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत पोलिसांची बाजू नेमकी काय आहे, हे अजून समोर येऊ शकलेलं नाही.