मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेने जरी मोठा पक्ष असला तरी बहुमताचा आकडा ते गाठू शकलेले नाहीत. त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली तर ते शक्य आहे. मात्र, युती होणार नाही, अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी युती करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आला नसल्याचे भाजपने म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांना शिवसेना-भाजप युती व्हावी, अशी इच्छा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे, हिंदुस्थानच्या मुद्द्यावर युती झालेले आहे. त्यामुळे याच मुद्द्यावर युती होईल. युती करण्याशिवाय दोघांना पर्याय नाही. तसेच निवडणुकीत झाले ते विसरायचे असते म्हणून युतीसाठी हात पुढे केलाय. प्रदेश अध्यक्ष रावराहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. शिवसेनेने अद्याप मुंबई महापालिकेसंदर्भात बोलणी केलेली नाही. बोलणी केली तर विचार करू, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे सांगण्यात येत आहे.


शिवसेनेने अद्याप भाजपकडे कोणताही प्रस्ताव पाठवला नाहीं. परंतु त्यांनी प्रस्ताव पाठवला तर भाजप विचार करेल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.