मुंबई : मुंबईकरांना महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं जुलैपासून मुंबईकरांची मदार राखीव साठ्यावर असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने  पालिकेने 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे. 31 जुलैपर्यंत मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, जूनचा अर्धा महिना पावसाविना गेलाय. मुंबईला सात धरणांपैकी जास्त पाणी पुरवठा केला जातो त्या भातसा आणि वैतरणा धरणांत जून अखेरपर्यंत पाणीसाठा असेल. 


अप्पर वैतरणा तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे जुलैपासून पालिकेला राखीव पाणीसाठ्यातून मुंबईकरांना पाणी पुरवठा करावा लागणार आहे. सध्या तलावांत 1 लाख 12 हजार 432 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. 


मागील वर्षी हा साठा 1 लाख 89 हजार 60 दशलक्षलिटर पाणीसाठा होता. सध्याचा पाणीसाठा 22 जुलैपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यानंतर राखीव पाणीसाठा वापरावा लागेल. सध्या दररोज ३२५० दशलक्ष लीटर पाणी मुंबईला पुरवले जाते.