मुंबई : दादर मराठी बाणा असलेलं मराठी माणसांचा ठिकाण, पण ऐकून आश्चर्य वाटेल दादरमधील पालिकेच्या मराठी शाळेत आज एकही विद्यार्थी नाही. 1972 साली सुरु झालेली पहिली ते दहावीची ही शाळा मोठ्या संक्रमणावस्थेतून जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तरच्या दशकामध्ये या शाळेत 12 वर्ग भरत होते, पण गेल्या काही वर्षांमध्ये शाळेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादरमधल्या मराठी शाळेचं हे भीषण वास्तव आहे. 


एकाबाजूला शिक्षणापासून वंचित असलेले शाळाबाह्य विद्यार्थी आहेत तर दूस-या बाजूला विद्यार्थी नसल्याने ही मराठी शाळा ओस पडली आहे. ही परिस्थिती कशी ओढवली ? याला जबाबदार कोण ? शाळाबाह्य विद्यार्थ्यांप्रमाणेच विद्यार्थीबाह्य मराठी शाळा शोधण्याची वेळ आलीय का ? शिक्षण मंत्री याकडे लक्ष देणार का ? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.