मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा, दोन दिवस पाणी नाही!
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचं काम मुंबई मनपातर्फे हाती घेतलं जाणार आहे त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचं काम मुंबई मनपातर्फे हाती घेतलं जाणार आहे त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
येत्या मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंत म्हणजे ३६ तास हे काम चालणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत २५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
या पाणी कपातीमुले मुंबईकरांनो मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर आणि बुधवारी संपूर्ण दिवसासाठी तुम्हाला पाण्याची तजवीज करून ठेवावी लागणार आहे.