मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीत 'पारदर्शक' काचेतून दिसत असल्याचा व्हिडीओ एएनआयवर आल्यानंतर, नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, यावर नारायण राणे यांनी आज माध्यंमासमोर येऊन उत्तर दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर नारायण राणे यांनी आपण अहमदाबादेत कुणालाही भेटलो नाही, तशी भाजपमध्ये येण्याची आपल्याला ऑफर जुनीच आहे, त्यावेळीही आपण हो किंवा नाही उत्तर दिलेलं नाही. आपण काल मुख्यमंत्र्यांना किंवा अमित शहा यांना अहमदाबादेत भेटलो नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी अहमदाबादेत होतो, काल कुणालाही भेटलो नाही, दहा वाजता माझी मिटिंग संपवल्यानंतर मी झोपून गेलो, मी हयात हॉटेलला होतो, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्र्यांच्या गाडीत जाणं म्हणजे भाजपात जाणं असं होतं नाही, यापूर्वीही मी दानवेंच्या मुलाच्या लग्नाला, तसेच नागपुरात एका लग्नाला एकच गाडीत गेलो होतो, असं नारायण राणे यांनी म्हटलं असलं, तरी आपण भाजपात जातोय किंवा नाही, यावर नारायण राणे यांनी स्पष्ट कोणतंही उत्तर दिलेलं नाही.