मुंबई : पाचशे, हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद ठरवल्याचा मुद्दा मुंबई महापालिकेच्या सभागृहातही गाजला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनतेला रांगेत उभे राहूनही सुट्टे पैसे उपलब्ध होत नसल्याचा प्रश्न काँग्रेसने मांडला. त्यानंतर भाजप गटनेते मनोज कोटक यांनी सुट्टे पैसे हवे असतील तर आम्ही उपलब्ध करून देतो असं वक्तव्य केल्यानंतर सामान्य जनतेकडे पैशांची वानवा असताना तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न करत काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.


काही काँग्रेस नगरसेवकांनी जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा खिशातून बाहेर काढून सभागृहात फडकावल्या. यानंतर सुट्टे पैसे पाहिजे असल्यास माझ्याकडे असं आव्हान भाजप गटनेता मनोज कोटक यांनी दिलं.. त्यामुळं आता कोटक यांच्या मुलुंडच्या मेहूल सिनेमागृहासमोर असलेल्या कार्यालय येथे 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जमणार आहेत.


भाजप गटनेते मनोज कोटक यांनी मात्र आपण तसं काही म्हटलंच नसल्याचा खुलासा केला. तसंच सभागृहात ज्यांनी नोटा फडकावल्या त्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.