मुंबई : राज्यातल्या नगरपालिकामध्ये पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यातल्या तब्बल २१५ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष नगरसेवकांमधून नव्हे तर थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. तसंच नगरपालिकेत दोन वॉर्डचा मिळून एक प्रभाग करण्य़ात येणार असल्याचाही निर्णय़ मंत्रिमडंळानं घेतलाय. ज्यात येत्या काही महिन्यांमध्ये होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. यामुळे नगरपालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार आहेत. 


नगराध्यक्ष हा थेट लोकांमधून निवडून देण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणुकीच्या गणितांवर परिणाम होणार आहे. नगराध्यक्ष थेट नागरिकांमधून निवडून दिला जावा, अशी मागणी होती. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीवेळी मतदारांना नगरसेवक निवडण्याबरोबरच नगराध्यक्षही निवडावा लागणार आहे. 


पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, पुणे आदी १० पालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याची निवडणूक कशी होणार, याबद्दल या शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.