मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोठमोठे मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमधे विविध पक्षाचे आणि संघटनांचे नेते खुलेआम सहभागी होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आतापर्यंत या मोर्चासंदर्भात भाजपा पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याने भाजपातील मराठा नेते या मोर्चापासून दोन हात दूरच राहत होते. 


चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपातील काही निवडक मराठा नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यावेळी मराठा समाजाचे हे मोर्चे सरकारविरोधात किंवा कुठल्या समाजाविरोधात नसल्याचे या मराठा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून दिले.


या मोर्चात आपण देखील सहभागी व्हायला हवे हे देखील पटवून दिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपातील मराठा नेत्यांना मोर्चात सहभागी होण्यास सहमती दिली.