मुंबई : आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी..लवकरच इंजीनिअरिंगच्या शेवटच्या सेमीस्टरमध्ये पास झाल्यावर विद्यार्थ्यांना एक्सिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंजिनिअरींगची पदवी मिळवूनही विद्यार्थ्यांमध्ये उद्योगांना अपेक्षित ते ज्ञान असतंच असं नाही. त्यामुळे नव्यानं पास होणाऱ्या इंजिनिअर्सकडून उद्योगांना अपेक्षित असा कुशल कर्मचारी मिळतच नसल्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे.


वरील तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांची एक्झिट टेस्ट घेऊन त्यांची नोकरीच्या बाजारात उभं राहण्याची पात्रता आहे का? याचा छडा लावण्यात येणार आहे. सध्या केवळ मेडिकलच्या विद्यार्थ्यांनाच ही टेस्ट द्यावी लागते.