नवी दिल्ली :  आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहू शकणार आहेत. कारण केंद्रीय मंत्रीमंडळाने 'मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ला मंजुरी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कायद्यामुळे दिवसा काबाडकष्ट करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना नाईट लाइफ अनुभवता येऊ शकते. कारण उच्चभ्रूंसाठी नाइटलाइफ नवीन नाही, त्यांचा दिवस रात्रीच सुरु होते. 


युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रात्री हॉटेल्स, दुकाने चालू ठेवण्याची मागणी केली होती.


दरम्यान, या कायद्यानुसार महिलांनाही पुरशा सुरक्षा व्यवस्थेच्या सहाय्याने रात्रपाळीत काम करता येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कर्मचा-यांना पिण्याचे पाणी, कॅन्टीन, प्राथमिक उपचारांचे साहित्य, स्वच्छतागृहे आदीची सोयी सुविधाही उपलब्ध होणार आहेत. 


रेस्टॉरंट्स्, दुकाने बँका, मॉल्स, आयटी फर्म्स इत्यादी वर्षभर दिवसरात्र त्यांच्या सोयीनुसार  सुरू राहू शकतात.