मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर चेंबूरमधल्या शिवाजी महाराज चौकात पेट्रोल टँकरनं ड्यूटीवर असलेल्या पोलीस पथकाला धडक दिली आहे. या धडकीमध्ये सहा पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी एक पोलीस गंभीर जखमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MH20CT8000 हा नंबर असलेल्या टँकरनं पाठीमागून या पोलिसांना धडक दिली. या टँकरचा चालक महादेव पवारला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. महादेव पवार हा औरंगाबदच्या असल्याची माहिती मिळत आहे. 


जखमी पोलिसांची नावं


सुखदेव सदाशिव कोळेकर 


अरुण आत्माराम सोनी


रामदास गोविंदा चारोसकर


सुनिता गंगाराम माने


सुरेखा धनसिंग पवार


या अपघातात सुखदेव कोळेकर हे गंभीर जखमी झाले आहेत.