मुंबई : पोलीस, फायर ब्रिगेड आणि रूग्णवाहिका सेवा लवकरच एकाच हेल्पलाइन नंबरवर उपलब्ध होणाराय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आपात्कालीन परिस्थितीच्या वेळी या तिन्ही यंत्रणांशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळा क्रमांक डायल करावा लागतो. त्यामुळं संबंधित यंत्रणांचाही समन्वय साधताना गोंधळ उडायचा. 


ते टाळण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. तिन्ही सेवांसाठी आता 112 हा एकच हेल्पलाइन क्रमांक डायल करता येणाराय. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.