मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली कोंडी अजूनबी कायम आहे. विधानपरिषदेचं कामकाजही सुरू होताच आज एका मिनिटात दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. कालही असंच घडलं होतं. कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दिवसभऱासाठी तहकूब करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विधानसभेतली कोंडीही कायम आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यावेळी सभेच्या सभागृहात येऊन कामकाजात सहभागी व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. निलंबनासंदर्भात सभागृहात चर्चा करु, त्यासाठी सभागृहात तर या, असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सांगितलं. पण विरोधक मात्र कामकाजावर बहिष्कार घालण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत.


सरकार आडमुठी भूमिका सोडायला तयार नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे विधानसभेतली कोंडी कायम राहिलीय आणि विरोधकांशिवायच कामकाज सुरू राहणार आहे.