पंकजा मुंडे म्हणतात, नाराजीचा विषयच कुठे?
राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट करत जलसंधारण खातं गेल्याचं दुःख नसल्याचं म्हटलंय.
मुंबई : राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट करत जलसंधारण खातं गेल्याचं दुःख नसल्याचं म्हटलंय.
दोनच दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये होत असलेल्या जल परिषदेत सामील होण्यासाठी गेल्या. पण त्यांच्याकडून हे खातं काढून राम शिंदेंकडे देण्यात आलंय. त्यामुळे आपण परिषदेला जाणार नाही असं पंकजा मुंडेंनी ट्विटरवर जाहीर केलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ट्विटवरच फटकारून परिषदेला हजर राहण्यास सांगितले.
सोशल मी़डियावर झालेल्या या नाराजी नाट्याची देशभर चर्चा झाल्यावर आता पंकजाताईंनी फेसबुकवर पोस्ट करत खाते बदलाबाबत नाराजी नसल्याचं म्हटलंय.
पुन्हा एकाद ट्वीटरवरच स्पष्टीकरण दिलंय. माझे निकटवर्ती राम शिंदे यांच्याकडेच हे जलसंधारण खातं गेलंय. याचा आनंद असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. शिवाय नाराजीचा विषयच कुठे? असंही त्या म्हणाल्यात.