मुंबई : परळ टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परेल उपनगरीय रेल्वे टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.  व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी पायाभरणी केली. 


परळ टर्मिनसचं काम पूर्ण झाल्यावर दादर स्टेशनवरचा ताण हलका होणार आहे. त्याचबरोबर दादरपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. सीएसटीवरून लोकल सेवा विस्कळीत झाल्यास कुर्ल्याहून कल्याण, कसाराकडे गाड्या सोडव्या लागतात. पण आता परळ टर्मिनसहून गाड्या सोडणं शक्य होईल. परळ टर्मिनसचं काम तीन वर्षात संपेल. या कामाचा खर्च 51 कोटी रूपये असणार आहे. तर पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सचा खर्च 154 कोटी रूपये असणार आहे.