मुंबई : मुंबईत इमारत कोसळण्याचा सिलसिला सुरुच आहे. बुधवारी रात्री भुलेश्वर भागात एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने ३ जण यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. पुरुषोत्तम नावाची ही इमारत दक्षिण मुंबईतील अत्यंत जुन्या अशा भुलेश्वर भागात आहे. 


घटनेत जखमी झालेल्या तिघांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीचा भाग कोसळण्यामागचं नेमके कारण अजून समजू शकलेलं नाही. मागील आठवड्यात भिवंडीत दोन इमारत कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यानंतर भुलेश्वरमध्ये आता ही घटना घडली आहे. त्यामुळं धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.