मुंबई : मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता लक्ष विविध समित्यांच्या अध्यक्षपद निवडीकडं लागलं आहे. तत्पूर्वीच राजकीय पक्षांनी समिती सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे माजी आमदार, प्रवक्ते अतुल शहा यांना भाजपने मुंबई पालिकेतील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि सुधार समितीमध्ये स्थान न देता बेस्ट समितीवर स्थान दिलंय. एकीकडे पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना तसंच निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्यांची स्थायी समितीमध्ये वर्णी लावलेली असताना अतुल शहा यांना मात्र डावलले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


कुसळेंची नाराजी दूर...


दुसरीकडं शिवसेनेने डिलाईल रोडचे शाखाप्रमुख राजेश कुसळे यांची बेस्ट समितीवर बिगर पालिका सदस्य म्हणून वर्णी लावत त्यांची नाराजी दूर केलीय. प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्यानं कुसळे नाराज झाले होते.


सेनेतून भाजपमध्ये गेलेले नाना आंबोले यांना भाजपनं बेस्ट समितीवर बिगर पालिका सदस्य म्हणून घेतलंय. नाना आंबोले यांची पत्नी या निवडणुकीत हरली होती. परंतु परळ भागात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नाना आंबोलेंना ताकद देण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय.


स्थायी समितीमध्ये शिवसेनेने यावेळी रमेश कोरगावकर वगळता आणि भाजपने मनोज कोटक वगळता पूर्णत: नवी टीम दिली आहे. तर आतापर्यंत शिवसेनेला साथ देणाऱ्या अभासेच्या गिता गवळी शेवटच्या टप्प्यात भाजपच्या गोटात गेल्या होत्या. त्यांनाही भाजपने स्थायी समितीवर घेतले आहे. 


श्रद्धा जाधव, विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य या तीन माजी महापौरांची वर्णी सेनेने सुधार समितीमध्ये लावली आहे तर माजी महापौर स्नेहल आंबेकर यांची वर्णी शिक्षण समितीवर लावली आहे. सर्व राजकीय पक्षांनी समिती सदस्यांची नावे कळवली असली तरी मनसेने मात्र अद्याप समिती सदस्यांची नावे चिटणीस विभागाकडे पाठविली नाहीत.  


स्थायी समिती एकूण सदस्य - 26 ( मनसेकडून 1 सदस्य नेमणूक बाकी)


यशवंत जाधव, राजुल पटेल, रमेश कोरगांवकर, चंगेज मुलतानी (अपक्ष), आशिष चेंबुरकर, संजय घाडी, सुजाता सानप, समिक्षा सप्रे, मंगेश सातमकर, सदानंद परब


भाजप - मनोज कोटक, अलका केरकर, शैलजा गिरकर, राजश्री शिरवडकर, प्रभाकर शिंदे, विद्यार्थी सिंग, अभिजीत सामंत, मकरंद नार्वेकर, गीता गवळी, पराग शहा


काँग्रेस - रवि राजा, आसिफ झकारिया, कमलजहा सिद्दीकी


राष्ट्रवादी - राखी जाधव


सपा - रईस शेख


सुधार समिती (एकूण 26 सदस्य... मनसेकडून 1 सदस्य नेमणे बाकी)


शिवसेना - श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, रमाकांत रहाटे, अनंत नर, स्वप्निल टेंबवलकर, किशोरी पेडणेकर, स्नेहल मोरे, चित्रा सांगळे, मिलिंद वैद्य, किरण लांडगे


भाजपा - उज्ज्वला मोडक, प्रकाश गंगाधरे, महादेव शिवगण, ज्योती अळवणी, शिवकुमार झा, सुनील यादव, सागरसिंह ठाकूर, योगीराज दाभाडकर, हरिश भंदिग्रे, जगदीश ओझा


काँग्रेस - विठ्ठल लोकरे, अश्रफ आझमी, जावेद जुनेजा


राष्ट्रवादी काँग्रेस - ज्योती हारुन खान


समाजवादी पक्ष - अब्दुल कुरेशी


शिक्षण समिती ( एकूण सदस्य 22, मनसेकडून 1 बाकी)


शिवसेना - शीतल म्हात्रे, शुभदा गुडेकर, संध्या दोषी, स्नेहल आंबेकर, जितेंद्र पडवळ, चंद्रावती मोरे, प्रज्ञा भूतकर, सुमंती काते, अंजली नाईक (स्वीकृत बिगर पालिका सदस्य - राहुल नरे, साईनाथ दुर्गे)


भाजपा - आसावरी पाटील, राम बारोट, सुनिता यादव, त्रिवेदी, पोतदार, श्रीकला पिल्ले, अनिष मकवानी (स्वीकृत बिगर पालिका सदस्य : आरती पुगावकर)


काँग्रेस - विनी डिसोझा, राजपती यादव, संगीता हंडोरे(स्वीकृत बिगर पालिका सदस्य - सुरेश सिंह)


राष्ट्रवादी काँग्रेस - सईदा खान


बेस्ट समिती ( एकूण सदस्य 16, मनसेकडून एक व राष्ट्रवादीकडून एक बाकी)


शिवसेना - अनिल पाटणकर, अनिल कोकीळ, सुहास सामंत, राजेश कुसळे, हर्षल कारकर, प्रविण शिंदे


भाजपा - अतुल शहा, कमलेश यादव, मुरजी पटेल, सुनील गणाचार्य, संजय (नाना) आंबोले, सरिता पाटील


काँग्रेस - रवी राजा, भूषण पाटील