काळा पैसा पांढरा करण्यासाठी देवस्थानांकडे धाव
काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय. काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याचीही चर्चा आता रंगू लागलीय. तर दुसरीकडे मंदिरांमध्यल्या अधिकृत देणगीत कमालीची घट झाल्याचं पुढं आली आहे.
मुंबई : काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय. काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याचीही चर्चा आता रंगू लागलीय. तर दुसरीकडे मंदिरांमध्यल्या अधिकृत देणगीत कमालीची घट झाल्याचं पुढं आली आहे.
मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दररोज सव्वा ते दीड लाखांची रक्कम पूजा आणि देणगीच्या रुपानं अधिकृतरीत्या जमा होते. मात्र 500 आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर हा आकडा थेट हजारांवर आलाय. सिद्धिविनायक मंदिरात गुरूवारी दिवसभरात केवळ 14 हजारांची देणगी जमा झाली आहे.