रेल्वेत मिळेल ५ मिनिटात पिझ्झा
रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे.
मुंबई : रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे.
याची सुरुवात एटीपी मशीनने म्हणजेच एनी टाईम पिझ्झा देण्याच्या सर्विसने होणार आहे. शहरात जिथे पिझ्झा ऑर्डर दिल्यावर तीस मिनिटात पोहोचतो.. पण आईआरसीटीसी मात्र पाच मिनीटात पिझ्झा मिळेल असा दावा करतेय.
आईआरसीटीसीच्या खास मशीनसाठी मुंबईच्या नितेश ठक्कर यांनी मेहनत घेतलीय. या पिझ्झा मेकींग मशीनची मुळ संकल्पना ही नेदरलेंडची आहे. पाच मिनिटात या मशीन द्वारे पिझ्झा बनेल असा दावा करण्यात येतोय. पिझ्झा सोबतच पुढील काळआत आणखी काही खाद्य पदार्थ तयार करता येतील यासाठीही काम सुरु आहे.
पाच मिनिटात पिझ्झा, कानावर सोडा डोळ्यावरही या गोष्टीचा विश्वास बसणार नाही. याची चटकदार शहानिशा करण्यासाठी झी मिडीय़ाने याची तपासणी केली.
एनी टाईम पिझ्झा मशीनमुळे रेल्वे प्रवाशांना कमीत कमी वेळेत शुद्ध आणि स्वादिष्ट पिझ्झा मिळणार आहे. सुरुवातीला ही मशीन मुंबईच्या वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे...