मुंबई : विमानतळवर ड्रोन कॅमेरानं छायाचित्रण करणाऱ्या तिघांना क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. मंगळवारी हे तिघे जण विमानतळ परिसरात छायाचित्रण करत होते.  त्यांच्या कडून दोन ड्रोन कॅमेरे आणि एक आयपॅड जप्त करण्यात आलाय.


एका खासगी विमान कंपनीच्या वैमानिकाने काही दिवसांपूर्वी देखील, ड्रोन पाहिल्याची माहिती दिली होती, यावरून मुंबईत काही ठिकाणी अॅलर्टही देण्यात आला होता.