मुंबई : शिवाजी पार्कमधील सेल्फी पॉईंटच्या जागेवरून वाद इतका विकोपाला गेलाय की या प्रकरणात आता मुंबई पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. सेल्फी पॉइंटच्या परिसराला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच उद्या सकाळी वॉर्ड ऑफिसर यांच्या दालनात पोलिसांनी मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या स्थनिक नेत्यांची बैठक बोलावली आहे. 


या बैठकीत वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तोपर्यंत सेल्फी पॉइंटची जागा कुणालाच दिली जाणार नसल्याचा पवित्रा पोलिसानी घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे.