मुंबई : स्थायी समितिमध्ये विरोधकांनी पेंग्विनचा मुद्दा उपस्थित केला. पेंग्विन परत पाठवावेत अशी मनसेने मागणी केली. उरलेल्या पेंग्वीनचा मृत्यूची प्रशासन वाट बघत आहे का ? असा प्रश्न मनसे गटनेता संदीप देशपांडेनी उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरलेल्या पेंग्विनची स्ट्रेस टेस्ट करा हास्यास्पद मागणी समाजवादी पार्टीने केली. मृत्यू झालेला पेंग्विन हा अत्यंतिक तणावामुळे मृत्यू पावल्याचा सपाने अनोखा शोध लावला आहे. 


प्रशासनानं प्रत्येक पेंग्विनची स्ट्रेस लेव्हल जाहीर करावी. पनवती लागल्यानं जर पेंग्विन मेला असेल आणि प्रकल्प अडत असतील तर पनवती दूर करण्यासाठी महापालिकेत लिंबू मीरची फंड मंजूर करावा अशी मागणी मनसे नगरसेवक संतोष धुरी यांनी केली आहे. 


विरोधकांची उद्धव ठाकरेंना केलं टार्गेट


पनवती लोकांमुळे पेंग्विन मेला असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पेंग्विन मृत्यूच्या स्थायी समितीत शोक प्रस्तावाची विरोधकांनी मागणी केली. स्थायी समितीत पेंग्विनवरुन सगळेच राजकिय पक्ष अकलेचे तारे तोडतांना दिसले.


राज ठाकरेंचे प्रत्यक्ष नाव न घेता राज ठाकरेंच्या घरातला पाळलेला कुत्रा त्यांच्या पत्नीला चावला म्हणून त्याला सोडून देले नाही असं उदाहरण देऊन शिवसेनेनं मनसेला टार्गेट केलं. 


पेंग्विन आणण्याच्या प्रस्तावावेळी कुणीही विरोध केला नव्हता. विरोधकांनीही पाठिंबा दिला होता. तर मग आता विरोध का ? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.