पॉपस्टार जस्टिन बीबर गोवंडीत आला आणि...
पॉपस्टार जस्टिन बीबर हा भारताच्या दौ-यावर असताना गोवंडी येथील शिवाजी नगर भागात अचानक भेट देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याने मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
मुंबई : पॉपस्टार जस्टिन बीबर हा भारताच्या दौ-यावर असताना गोवंडी येथील शिवाजी नगर भागात अचानक भेट देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याने मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम सुमारे 50 हजार चाहत्यांच्या साक्षीने जस्टिन बीबरचा मेगा शो बुधवारी रात्री पार पडला. जस्टिनची लाईव्ह कॉन्सर्ट संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चालली होती. तोच जस्टिन अगदी साधेपणाने शिवाजी नगरमध्ये आला. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
जस्टिनने यावेळी मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. तसेच एनजीओत जाऊन लहान मुलानांही भेटला. हेलिकॉप्टर आणि रोल्स रॉयस गाडीची मागणी केलेल्या जस्टिनने साध्या भारतीय बनावटीच्या गाडीतून भेट दिली.