(कविता शर्मा, झी मीडिया) मुंबई : मुंबईच्या बेलगाम वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि पोलिसांचं काम सोपं करण्यासाठी पोर्टेबल सिग्नलचा पर्याय शोधण्यात आलाय. हे पोर्टेबल सिग्नल नेमके कसे असतील पाहूया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत अचानक तुमच्या घराबाहेर ट्रॅफीक सिग्नल आला तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण मुंबई पोलिसांना पोर्टेबल सिग्नलचा पर्याय सापडला आहे. 


मुंबई शहरात एकूण १२०० सिग्नल आहेत. मुंबईचं अवाढव्य ट्रॅफीक पाहता ही संख्या कमीच आहे. त्यातच मेट्रोची जागोजागी सुरू असलेली कामं, रस्ते दुरूस्ती, वर्षभर सुरू असलेले विविध उत्सव यांमुळे डायव्हर्जन्स करावी लागतात. यामुळे वाहनचालकांना आवरताना पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागते. यावर उपाय म्हणून हे पोर्टेबल सिग्नल अशा ठिकाणी उपयोगाला येऊ शकतील. 


८ तास चार्ज केल्यावर सिग्नल्स २४ तास सुरू राहतील. मोठे उत्सव, राजकीय सभा, रॅलीज, दुरूस्ती कामं यावेळी हे सिग्नल उपयोगी येतील. सध्या वाहतूक शाखेकडे १३ पोर्टेबल सिग्नल्स आहेत. शहरात ११ ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झालीय. 


महानगरी मुंबईच्या अवाढव्य ट्रफीकला काबूत ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं गरजेचं होतं. पोर्टेबल सिग्नल्सच्या रूपात मुंबई पोलिसांनी त्याच दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलंय.