प्रकाश आंबेडकरांचं मुख्यमंत्र्यांना उघड-उघड आव्हान...
दादरमधलं आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान-श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडल्यानं अनेक जण नाराज आहेत.
मुंबई : दादरमधलं आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान-श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडल्यानं अनेक जण नाराज आहेत.
'द पीपल्स इम्प्रुवमेंट ट्रस्ट' आणि आंबेडकर कुटुंबीय यांच्या कलहात ही ऐतिहासिक वास्तू वादग्रस्त बनली. परंतु, आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्यामागे दोन गटांमधला वाद आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहिररित्या विधान करण्याची हिंमत दाखवावी, असं आव्हानच आता भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय. इतकंच नाही तर, असं घडलं तर भविष्यात आपणही मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यास मोकळे असू, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय.
अटकेची मागणी...
आंबेडकर भवनाला उद्ध्वस्त करणारे राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टमधील त्यांच्या साथीदारांच्या अटकेच्या मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले, असं त्यांनी म्हटलंय.
मुंबईत मोर्चाचं आयोजन
गाडकवाड आणि त्यांच्या मोकाट साथीदारांना अटक व्हावी यास्ठी १५ जुलैला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्वही प्रकाश आंबेडकर करणार आहेत.
उभं राहणार नवीन आंबेडकर भवन
आंबेडकर भवनाची इमारत जुनी झाल्यानं ती पाडण्यात येतेय. त्याजागी तब्बल ६० कोटी रूपये खर्च करून नवीन १७ मजली इमारत बांधण्यात येईल. इथं पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीचं केंद्र प्रस्थापित होईल असा दावा 'द पीपल्स इम्प्रुवमेंट ट्रस्ट'नं केलाय.