१००९ रन करणारा कल्याणच्या प्रणवचं दहावीत यश
मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी साकारणारा कल्याणचा प्रणव धनावडे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. प्रणवने परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवले आहेत. क्रिकेटच्या मैदानासोबतच अभ्यासात देखील प्रणवची कामगिरी चांगली असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कल्याण : मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी साकारणारा कल्याणचा प्रणव धनावडे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. प्रणवने परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवले आहेत. क्रिकेटच्या मैदानासोबतच अभ्यासात देखील प्रणवची कामगिरी चांगली असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रणवच्या कुटुंबियांनी त्याच्या यशावर आनंद व्यक्त केला आहे. प्रणवने जानेवारी महिन्यात झालेल्या भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद १००९ धावांची खेळी केली. त्यानंतर झालेल्या दहावीच्या परीक्षेत प्रणवनं हे धवल यश मिळवलंय. यानिमित्तानं प्रणववर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.