मुंबई : अनंतचतुर्दशी उद्यासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी करण्यात आलीय. चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिका आणि पोलिसांकडून बाप्पाच्या विर्सजनासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी सुचना फलकही लावले आहेत.


घरगुती आणि सावर्जनिक बाप्पाच्या विसर्जनासाठी वेगवेगळी सोय करण्यात आली आहे.


तसंच मान्यवरांसाठी खास मोठा मंच गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आला आहे.


कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये. सर्वत्र पोलिसांची करडी नजर रहावी यासाठी ठिकठिकाणी CCTV लावण्यात आले आहेत.