मुंबई: काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.  पण उद्धव ठाकरेंच्या प्रकृती चौकशी करण्यासाठी दत्त मातोश्रीवर आल्याचं दोन्ही बाजूंनी सांगण्यात आलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान गेल्या सहा महिन्यात दत्त आणि ठाकरेंची ही दुसरी भेट असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाम आलं आहे. पण दत्त कुटुंब आणि मातोश्रीचे जुने संबंध आहेत. त्यामुळे भेटीतून कुठलाही राजकीय अर्थ काढू नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 


शनिवारी कांदिवलीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.