मुंबई : मुंबईत भाजपाच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री राजीनामा देतील का ?, असं आव्हान राहुल शेवाळे यांनी दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इम्प्रुवमेंट कमिटी भाजपकडे असल्याने मुंबईतल्या कित्येक जागा बिल्डरांना विकण्यात आल्याचा आरोप राहूल शेवाळे यांनी केला आहे. 


नोटबंदीच्या रात्री कोणत्या उद्योजकाला मुख्यमंत्री भेटले, हे त्यांनी जाहीर करावे, 


११४ जागा आल्या नाहीत तर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री राजीनामा देतील का ?, असं आव्हान राहुल शेवाळे यांनी शेलारांसह मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.


भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी मॅच फिक्सर असल्याचा आरोप केला आहे, आपला स्कोअर किती होणार हे त्यांना सामना होण्याआधीच कळते, यामुळे आधीच त्यांनी हार पत्करली असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याविरोधात तक्रार नोंदवली असली, तरी अद्याप गृहखात्याकडून कारवाई झालेली नाही, 
भाजपा गृह मंत्रालयाचा वापर करुन निवडणूक  जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच  मुंबईकर २३ तारखेला हे दाखवून देतील, असे  राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.