नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मुंबईतील उपनगरीय रेल्वेसंदर्भात सुरेश प्रभू कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष्य लागले होते. मात्र, सुरेश प्रभूंनी कोणतीही मोठी घोषणा न करता मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्याला प्राधान्य दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 
आगामी वर्षात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील उंची वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल या दोन नव्या उन्नत मार्गांच्या उभारणीची घोषणा प्रभूंनी यावेळी केली.


 


 मुंबईकरांसाठी पाहा प्रभूंनी काय दिलं?


- सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार 
-  चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग
- चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग मेट्रो रेल्वेच्या स्थानकांशी जोडणार 
- सुरक्षित प्रवासासाठी सर्व स्थानकांवरील रेल्वे फलाटांची उंची वाढवणार


 
- मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळदरम्यान विशेष कॉरिडॉर 
- चर्चगेट-विरार उन्नत मार्गाच्या कामासाठी तातडीने निविदा मागवणार
- अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात 
- जपानच्या सहकार्याने अहमदाबाद-मुंबई हायस्पीड कॉरिडॉअरची स्थापना करणार