प्रवाशांच्या आंदोलनामुळे रेल्वे रखडल्या - रेल्वे प्रशासनाच्या उलट्या बोंबा
आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बो-या वाजलाय. टिटवाळा आणि खडावली दरम्यान मुंबईकडून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबवली आता तब्बल अडीच तासांनी सुरू झाली. प्रवाशांच्या आंदोलनामुळेच वाहतूक खोळंबल्याचा कांगावा रेल्वे प्रशासन करतंय.
मुंबई : आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बो-या वाजलाय. टिटवाळा आणि खडावली दरम्यान मुंबईकडून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबवली आता तब्बल अडीच तासांनी सुरू झाली. प्रवाशांच्या आंदोलनामुळेच वाहतूक खोळंबल्याचा कांगावा रेल्वे प्रशासन करतंय.
प्रत्यक्षात रात्रीचा पावरब्लॉक लांबल्यावर एक्स्प्रेस गाड्या पुढे काढल्यानं प्रवाशांचा संताप झाला. एक्स्प्रेस गाड्या पुढे काढणार असाल, तर मधल्या स्थानकांवर त्यांना थांबा देण्यात यावा अशी प्रवाशांची प्रमुख मागणी होती. या मागणीसाठी टिटवाळा स्थानकात शेकडो प्रवासी सध्या आंदोलनासाठी उतरले . परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचा-यांची मोठी कुमक हजर झाली आणि त्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आता आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.