कोकणसह मुंबईत पाऊस मात्र, राज्यातील धरण क्षेत्राकडे पाठ
कोकण आणि मुंबईत पावसाने तळ ठोकला असला तरी राज्यातील धरणांच्या क्षेत्रात अद्यापही हवा तसा पाऊस सुरु झालेला नाही. त्यामुळे राज्यावरील पाणीटंचाईचं संकट अद्यापही कायमच आहे.
मुंबई : कोकण आणि मुंबईत पावसाने तळ ठोकला असला तरी राज्यातील धरणांच्या क्षेत्रात अद्यापही हवा तसा पाऊस सुरु झालेला नाही. त्यामुळे राज्यावरील पाणीटंचाईचं संकट अद्यापही कायमच आहे.
राज्याच्या जलाशयांतील सर्व प्रकल्पांत केवळ ९ टक्के साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच सुमारास २५ टक्के जलसाठा होता. दरम्यान सध्या राज्यातील ४ हजार ७५५ गावं आणि ६ हजार ९५८ वाड्यांना २८ जूनपर्यंत टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यात मराठवाड्यातील २ हजार ८३२ गावं आणइ ९०६वाड्यांचा समावेश असून ३ हजार ८४० टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.
राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून १ जून ते २८ जून अखेर १३९.९ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ६६.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या १०९.५ टक्के एवढा झाला होता. मात्र यंदार राज्यातील धरण क्षेत्राकडे पावसाने सपशेल पाठ फिरवली आहे.