मुंबई : दामिनी सेन... तिला आज सारं जग सलाम करतं. हातांविनाच तिनं साऱ्या जगावर विजय मिळवला. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये तिचं नाव कोरलं गेलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातांविना तिनं कारनामा केलाय... दामिनी सगळीचं कामं पायानं करते... आणि याच पायांनी तिनं एक दोन नव्हे तर 38 पेन्टिंगज् काढल्या त्याही अवघ्या एका तासात... या कारनाम्यामुळे तिचं नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये कोरलं गेलंय. 


एखाद्या दिव्यांगाला ज्या नजरेनं पाहिलं जातं त्याच नजरेनं दामिनीलाही समाज पहात होता... या नजरांना दामिनी कमकूवत, हतबल, असह्य दिसली... पण ती तशी नव्हती हे तिनं दाखवून दिलं. तिच्याकडे दयेनं पाहणाऱ्या नजरा आता कौतुकात बदलल्यात.


मोदींनीही केलं कौतुक


दामिनीच्या जन्मानं कुटुंबासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. पण दामिनीनं सा-यांची उत्तर शोधली. पावला - पावलावरच्या संघर्षाला तोंड दिलं... सामान्य मुलं मुली जे करू शकत नाहीत ते तिनं करून दाखवलं तेही अगदी कमी वयात... कम्प्युटर सायन्समध्ये ती सध्या बीएससी करतेय. राज्य पातळीवर तिनं अनेक पुरस्कार मिळवलेयत. एव्हढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचं कैतुक केलंय.


कुटुंबाला दामिनीचा अभिमान


दामिनीला आज तिच्या पालकांच्या नावे नाही तर पालकांना तिच्या नावे ओळखलं जातंय. दिव्यांगांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना दामिनी म्हणजे 'हथेली पर किस्मत की लकिरे नही हैं...' शारिरीक कमतरता म्हणजे आयुष्याला पूर्णविराम नव्हे, तर तिचं खरी सुरूवात आहे असं दामिनी म्हणते...