COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  'रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्या तर जाळून टाका' असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. मनसेच्या पक्षाच्या दहाव्या वर्धापनदिनी ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


परिवहन खात्याकडून नवीन रिक्षांचे ७० टक्के परवाने परप्रांतियांना देण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळं नव्या रिक्षा दिसल्या तर त्या जाळून टाका, असं वक्तव्य राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलंय. 


हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची चिन्ह आहेत. या भाषणाची आता चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे, पण राज ठाकरे नेमके काय बोलले ते या व्हिडीओतच पाहा.