मुंबई : मुंबई-अहमदाबाद या रूटवरच बुलेट ट्रेन का काढली असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे, तसेच मुंबईतील लोकांचं अहमदाबादेत काही काम अडत नाही, तरीही बुलेट ट्रेन याच मार्गावर का काढली, ती मुंबई चेन्नई, मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.


बुलेट ट्रेनची मुंबईत स्टेशन तीनच आहेत, तर गुजरातमध्ये ७ स्टेशन लागतात, तसेच गुजरातमधील आणखी काही स्टेशन्स वाढवली जाणार आहेत, असंही यावेळी सांगितलं, यावेळी राज ठाकरे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची देखील फिरकी घेतली. जेव्हा पाहावं तेव्हा सुरेश प्रभू तंबाखू चोळल्यासारखे हात चोळत असतात असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.