मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांनी कृष्णकुंजवर जावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असं मनसेच्या सूत्रांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ही भेट आज सकाळी आठ वाजता ठरली होती. पण अचानक बाबा रामदेव यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर येण्याचं निमंत्रण आलं. त्यामुळे बाबा रामदेव आधी वर्षा बंगल्यावर गेले. 


तिथे मुख्यमंत्र्यांना भेटून मग त्यांनी कृष्णकुंज गाठलं. राज ठाकरेंनी बाबा रामदेव यांना भेटून आनंद व्यक्त केलाय. रामदेव भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदाचे जागतिक प्रचारक आहेत असंही राज यांनी म्हटलं आहे.