दाऊदचे एवढे वाईट दिवस आले का!
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एकनाथ खडसे यांची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. कथित दाऊद कॉल प्रकरण, एमआयडीसी प्लॉट प्रकरण आणि पीए गजानन पाटील लाच प्रकरणाच्या आरोपावरून एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता.
मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एकनाथ खडसे यांची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. कथित दाऊद कॉल प्रकरण, एमआयडीसी प्लॉट प्रकरण आणि पीए गजानन पाटील लाच प्रकरणाच्या आरोपावरून एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता.
दाऊद इब्राहिमवर एवढे वाईट दिवस आले का की त्याला खडसेंना फोन करावा लागला, असा टोला राज ठाकरेंनी हाणला आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते UPSC आणि MPSC परीक्षेततल्या यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार, मुंबईतल्या दीनानाथ नाट्यगृहात केला गेला. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र नेहमी देशाचा विचार करतो. इतर राज्यं मात्र स्वत:चा विचार आधी करतात. त्यामुळेच यशस्वी UPSC आणि MPSC परीक्षेतल्या यशवंतांनी, महाराष्ट्राचा विचार सगळ्यात आधी करावा असं आवाहन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्रात मराठी तरूणांना आधी नोक-या मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर उरलेल्या नोक-या बाकीच्यांना दिल्या जाव्यात, असा इशाराही राज यांनी यावेळी दिला.