मुंबई : महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालं आहे. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटिशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय. सावित्री नदीवरचा ब्रिटीशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला. पण यापुल धोकादायक झाल्याची कल्पना ब्रिटीशांनी देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार राज ठाकरेंनी केली आहे.


नाशिकच्या पुराबद्दलही राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली. शिवाय या पुरानंतर झालेल्या हानीला जबाबदार कोण असा प्रश्नही राज ठाकरेंनी केला आहे. शिवाय वेगळा विदर्भाचा मुद्दा मुख्य मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकारनंच उचलल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. याशिवाय जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वादाविषयी काही बोलणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय उद्धव ठाकरेंशी झालेली भेट खाजगी असल्याचं म्हटलंय.