मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. सध्या मनसेची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात आहेत. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तरी मनसेत शांतता आहे. त्यातच शिवसेनेचा भाजपसोबतचा काडीमोड झाल्याने मनसेने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राज यांना वेटिंगवरच ठेवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दादर, शिवाजी मंदिरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी राज उद्या भूमिका मांडणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेशी युती करण्याच्या घडामोडींवर राज ठाकरे पहिल्यांदाच भाष्य करणार आहेत.


या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांची यादी घोषित करण्याची शक्यता आहे.शिवसेनेने युती करण्याचे फेटाळल्यानंतर आज दिवसभर राज ठाकरे यांनी इच्छुकांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीत मनसे आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. पक्षात सुरु असलेल्या नगरसेवकांच्या गळतीवर राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष आहे.