राजू शेट्टींचं विधिमंडळाच्या गेटसमोर आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज विधीमंडळाच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज विधीमंडळाच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यभ खासदार राजू शेट्टी स्वतः यावेळी आंदोलनाचं नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांनी तूर, कांदा अक्षरश: विधीमंडळाच्या गेटवर फेकून दिला.
खरं तरं स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये सहभागी आहे. तरीसुद्धा शेतमालाच्या भावाविषयी सरकार उदासीन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अचानक सुरू झालेल्या या आंदोलनानं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मोठ्या प्रमाणात कांदा आणि तूर विधीमंडळाच्या गेटवर सांडलेला स्पष्ट दिसत होता.
सदाभाऊ मात्र आजही आंदोलनापासून दूरच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन असलं, की सदाभाऊ खोत आंदोलनात अग्रभागी असतात... पण आता तेच मंत्री असल्यानं आंदोलनात सहभागी नव्हते, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय.