मायावतींच्या विरोधात राखी उतरणार मैदानात
बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांच्याविरोधात राखी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
मुंबई : बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांच्याविरोधात राखी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ही माहिती दिली. आगामी निवडणुकीत मायावती यांनी निवडणूक लढवल्यास त्यांच्याविरोधात राखीला रिंगणात उतरवणार असल्याचे आठवले म्हणाले.
तसेच भाजपसोबत युती न झाल्यास रिपाई स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशात दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचेही आठवले यांनी म्हटलेय.