कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा मुद्दा आज विधीमंडळात गाजणार
राज्य विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा मुद्दा गाजणार आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज याच प्रकरणावर अल्प कालीन चर्चा होणार आहे.
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा मुद्दा गाजणार आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज याच प्रकरणावर अल्प कालीन चर्चा होणार आहे.
याप्रकरणी विरोधक सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्याच्या तयारीत आहे. याविषयी काँग्रेस नेते नारायण राणे, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे सरकारला धारेवर धरतील अशी शक्यता आहे. इकडे विधानसभेत याप्रकरणी स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानं विरोधक संतप्त आहेत.
विरोधकांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केलीय. याचमुद्द्यावर काल कामाकाजाच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवेदन दिले आहे. पण हे निवेदन पुरेसं नाही, असं अजित पवारांनी विधानसभेत म्हटले आहे. सरकार चर्चेला तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे आता विधानसभा चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.