मुंबई : घर खरेदी करताना सर्वाधिक काळ्या पैशांचा वापर होत असतो, म्हणून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बंद झाल्याने, सर्वाधिक फायदा नवं घर खरेदी करू इच्छीणाऱ्या लोकांना होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण घरांच्या किंमती गगनाला भिडण्यासाठी काळा पैसा जबाबदार आहे. जेव्हा आता कर्जाशिवाय इतर पैसा, ज्याचं कोणतंही अकाऊंट नाहीय, असा पैसा तयार होणारच नसेल, अशा पैशांची आवक थंडावल्याने नव्या घराच्या किमती या २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार आहेत.


नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यानंतर, नवीन घर घेणाऱ्यांचे व्यवहारही तुर्तास थांबले आहेत.