मुंबई : मुंबईच्या एमएमआरडीए क्षेत्रात सरकारतर्फे सुरु होत असलेल्या रेंटल हाऊसिंग स्किम अंतर्गत पन्नास टक्के घरं गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिलीय. या निर्णयामुळे गिरणी कामगारांना ७ हजार ७०० घरं मिळणार आहे.  


सरकारनं याआधी १० हजार ७६८ घरं मिल कामागारांना दिली होती.आता त्यात नव्या घरांची भर पडणार आहे. त्यामुळे प्रत्येकी 320 स्वेअर फुट क्षेत्रफळाची एकूम 18 हजार 468 घरं गिरणी कामगारांना मिळणार आहेत. दरम्यान सामन्य नागरिकांना परवड़णारी घरं मिळवून देण्यासाठी सातत्यानं काम करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरनवर म्हटलं आहे.