मुंबई :  सध्या सोशल मीडियावर टोल नाक्यावरील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ यलो लाइन (पिवळा पट्टा ) संदर्भातील आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील कुठल्याही टोल नाक्यावरती जर आपणास टोल वरती ताटकळत उभा राहावे लागले तर काय करावे? असे विचारत आकाश तांबडे या युवकाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 


 



दुसरा व्हिडिओ


 



पाहा काय अनुभव आला आकाशला 


वाचा...
टोल बूथ पासून शंभर मिटर चा एक *पिवळा पट्टा* आखलेला असतो जर वाहनांची रांग या *पिवळ्या पट्याच्या* बाहेर गेली तर, शंभर मिटर पट्याच्या बाहेरील सर्व वाहने मोफत सोडावीत.


तसेच *पिवळ्या पट्ट्याच्या आत 3 मिनीटा* पेक्षा जास्त वेळ लागला तर ही आपण टोल भरून नये. असा राज्य शासनाचा आदेश आहे.


या नियमाचे उल्लंघन टोल कर्मचारी करत असतील तर, पोलीसांशी संपर्क साधून लिखीत तक्रार टोल कंपनी विरोधात करावी.


काल माझ्या सोबत *पुणे टू मुंबई उर्से टोल नाक्यावरील* घडलेली हि घटना व त्याचे दोन व्हिडिओ मी शेअर करत आहे.


मी टोल वरती 6 मिनीट फसलो होतो वरील *पिवळ्या पट्ट्याचा* नियमाचे आधारे पहिल्या बूथ वरून सुटलो.