मुंबई : डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर राज्यातील निवासी डॉक्टकांनी सामूहिक रजेचे आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्यात आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील तसे लेखी आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे न घेतल्यास 6 महिन्यांचा पगार कापण्यात येईल, असा स्पष्टा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवासी डॉक्टर यांना आवाहन करीत आहे. कामांवर यावे, रुग्णांचे हाल होत आहेत. आम्ही लेखी आश्वासने दिली आहेत. सुरक्षा पुरवण्याचे असे आश्वासन दिले आहे. सुरक्षेची मागणी एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. जर आज रात्री 8 पर्यंत डॉक्टर कामावर आले नाहीत तर 6 महिन्याचा पगार कापला जाईल, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारने मार्डला देत ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट केलेय.


दरम्यान, मुंबईतही निवासी डॉक्टरांना प्रशासनाकडून तंबी देण्यात येत आहे. कामावर रुजू व्हा नाही तर कारवाई केली जाईल, असे सायन हॉस्पिटलचे डीन सुलेमान मर्चंट यांनी निवासी डॉक्टरांना नोटीशीद्वारे बजावले आहे.


तसेच एमडी, एमएसचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालनालय आरोग्य विद्यापीठाला याबाबत सूचना करणार आहे. आजच्या बैठकीत निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला नाही तर विद्यार्थी असल्याची नोंदणी रद्द होणार आहे. डिएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ही माहिती दिली.