रेल्वे पोलिसाच्या या कृतीमुळे प्रवासी भेदरले
सार्वजनिक ठिकाणी बंदूक पकडण्याचे काही नियम असतात. बंदूकिची नळी जमिनीकडे अथवा आकाशाच्या दिशेने धरायची असते. कारण बंदूक हे एकप्रकारचं यंत्र असतं. ज्यात कोणत्याही क्षणी बिघाड होऊ शकतो. बंदुकीतून चुकून गोळी चालली तर ती कोणाला लागू नये म्हणून ती जमीनीच्या किंवा आकाशाच्या दिशेकडे धरतात. मात्र अबरार अहमद नावाचे हे रेल्वे पोलीस कर्मचारी बहुदा हे विसरुन गेले की ते ट्रेनमध्ये आहेत. भर ट्रेनमध्ये अशाप्रकारे ३०३प्रकारचं शस्त्र निष्काळजीपणे मांडीवर घेऊन बसले आहेत. या बंदुकीच्या दहशतीनं त्याच्या शेजारी कुणीच बसत नव्हतं.
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी बंदूक पकडण्याचे काही नियम असतात. बंदूकिची नळी जमिनीकडे अथवा आकाशाच्या दिशेने धरायची असते. कारण बंदूक हे एकप्रकारचं यंत्र असतं. ज्यात कोणत्याही क्षणी बिघाड होऊ शकतो. बंदुकीतून चुकून गोळी चालली तर ती कोणाला लागू नये म्हणून ती जमीनीच्या किंवा आकाशाच्या दिशेकडे धरतात. मात्र अबरार अहमद नावाचे हे रेल्वे पोलीस कर्मचारी बहुदा हे विसरुन गेले की ते ट्रेनमध्ये आहेत. भर ट्रेनमध्ये अशाप्रकारे ३०३प्रकारचं शस्त्र निष्काळजीपणे मांडीवर घेऊन बसले आहेत. या बंदुकीच्या दहशतीनं त्याच्या शेजारी कुणीच बसत नव्हतं.
बंदूक आडवी धरल्यानं तिची नळी बाजूच्या सीटवरील प्रवाशांच्या दिशेने ताणली गेली होती. त्यामुळे ते प्रवासीही भेदरले होते. चुकून मिसफायर झाली असती तर ती कोणाला लागली असती. सीएसटीहून बसलेल्या या कर्मचाऱ्याला त्याचं काहीच गांभिर्य नव्हतं. साथीदारांसह तो मुलुंडला उतरला आणि ट्रेनमधील प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. मुलुंडहून बसणारे आरपीएफ बहुतेकवेळा असाच प्रवास करतात. यातले थोडेच कर्मचारी शस्त्रबाळगण्याचे नियम पाळतात. अबरार अहमद तर चक्क मोबाईलवर गेम खेळत बसले होते.